ललीत पटेल यांना ३ सुवर्ण   

अहमदाबाद : जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे नामांकित खेळाडू ललीत पटेल यांनी सलग ३ सुवर्ण पदकांची कमाई केली. ही स्पर्धा थायलंडमध्ये  पटाया शहरात पार पडली. ललीत पटेल यांनी वयाच्या ५६ व्या वर्षी ही कामगिरी करत सर्वांना आश्चर्यचकीत केले. त्यांनी ८३-९३ किलो वजनी गटात ही कामगिरी केली. या स्पर्धेची तयारी पटेल हे मागील ८ महिन्यांपासून करत होते.  त्यांनी शाकाहार घेत स्वत:ला तंदुरुस्त ठेवले. तर मागील ५ वर्षांपासून त्यांनी या पॉवरलिफ्टिंग क्रीडा प्रकारात विविध स्पर्धांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. तसेच त्यांचे चाहते त्यांच्यावर अत्यंत खुष आहेत. 

Related Articles